चहासोबत खारीसारखी तिखट शंकरपाळी | Shankarpali Recipe In Marathi
चहासोबत खारीसारखी तिखट शंकरपाळी | Shankarpali Recipe In Marathi
साहित्य -
३ कप मैदा,
१¼ कप साधे पाणी,
½ tblsp काळीमीरी पूड,
१ tblsp कसुरी मेथी,
२ tblsp बेसन,
१ tsp ओवा,
½ tblsp साखर,
२½ tblsp मोहनासाठी तेल,
चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती -
प्रथम एका परातीत मैदा घेऊन त्यात कसुरी मेथी, काळीमीरी पूड, बेसन, साखर, ओवा, आणि चवीनुसार मीठ घालावे आणि एकजीव करून घ्यावे.
आता एका पॅनमध्ये तेलाचे मोहन गरम करून घ्यावे.
तेल जास्त कडकडीत गरम करू नये. त्यानंतर यात गरम तेलाचे मोहन घालावे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे.
आता साध्या पाण्याचा वापर करून पीठ चपातीपेक्षा घट्ट असे मळून घ्यावे.
पिठाचे गोळे तयार करून त्याच्या पोळ्या लाटाव्यात आणि शंकरपाळ्या पाडून घ्याव्यात.
गरम तेलात मध्यम आचेवर शंकरपाळी सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्यावी
COMMENTS