लसूण शेव : शेव महिनाभरापेक्षा जास्त दिवस कुरकुरीत राहील
लसूण शेव : शेव महिनाभरापेक्षा जास्त दिवस कुरकुरीत राहील
साहित्य -
३ कप बारीक बेसन,
¼ कप तांदळाचे पीठ,
४ tblsp तेल मोहनासाठी ,
१½ tsp लाल मिरची पावडर,
½ tsp हळद,
½ tsp हिंग,
१½ tblsp ओवा
जिरं कुटलेले ,
½ cup लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती -प्रथम छोट्या पॅनमध्ये तेल चांगले गरम करून घ्यावे. ( तेल कडकडीत गरम नसावे. )
एका परातीत बेसन आणि तांदळाचे पीठ चाळून घेऊन त्यावर गरम तेल ओतावे आणि चांगले एकजीव करून घ्यावं.
मिश्रण एकजीव झाल्यावर यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा जिरं कुटलेलं , लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिश्रणात एकजीव करून घ्यावे.
आता यात साधे पाणी घालून सैल असा गोळा तयार करून घ्यावा आणि शेवयाच्या साच्यात भरून गरम तेलात मध्यम आचेवर शेव कुरकुरीत तळून घ्यावी.
हि शेव महिनाभर हवाबंद डब्ब्यात भरून कुरकुरीत आस्वाद घेऊ शकतो.
COMMENTS