पापलेट सुक्का | Paplet Sukka
पापलेट सुक्का | Paplet Sukka
साहित्य –
१ मोठं पापलेट,
½ कप ओल्या नारळाचा खीस,
१ कांदा बारीक चिरलेला,
१ टोमॅटो बारीक चिरलेलं,
१½ tblsp घरगुती लाल मसाला,
१ tsp हळद,
६/७ सुक्या ब्याडगी मिरची,
३ हिरव्या मिरच्या,
६/७ लसुण पाकळ्या,
मूठभर कोथिंबीर,
१½" आले,
६/७ कोकम पाकळ्या,
२ tblsp धणे,
१ tblsp जीरे,
२ त्रिफळा,
चवीनुसार आणि
७ tbslp तेल.
कृती –
प्रथम पापलेट स्वच्छ करून घ्यावं.
त्यानंतर मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा खीस, सुक्या
ब्याडगी मिरची, हिरव्या मिरच्या, लसुण
पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, आले, धणे,
जीरे, त्रिफळा इत्यादी बारीक वाटून घ्यावं.
आता कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो मऊसर परतून
घ्यावं.
त्यानंतर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालून एकजीव करावं.
आता यात तयार वाटण घालून ३/४ मिनिटे चांगलं मध्यम आचेवर भाजून घ्यावं.
आता त्यानंतर यात पापलेट घालावे आणि सोबत चवीनुसार मीठ, कोकम
पाकळ्या आणि १ कप पाणी घालून हलक्या हाताने चांगले एकजीव करावे.
त्यानंतर १५ मिनिटे वर झाकण ठेवून बारीक गॅसवर पापलेट चांगली
शिजवून घ्यावीत.
१५ मिनिटांनी वर बारिक चीरलेली कोथिंबीर भुरभुरावी आणि
गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
भाकरीसोबत काही लचपचीत आणि चमचमीत खायचं तर बनवा लाजवाब असा
पापलेट सुक्का
Tag-पापलेट फ्राय,भरलेले पापलेट,paplet sukka,paplet kalvan,पापलेट करी,पापलेट मसाला,पापलेट रस्सा,पापलेटचं सुक्कं,paplet masala,paplet fish curry,पापलेट,चविष्ट पापलेटचे कालवण,paplet curry,paplet sukka masala,मसाला पापलेट,paplet recipe,paplet fry recipe in marathi,paplet fish fry,पापलेट तवा फ्राय,पापलेट करी मराठी,paplet green masala sukka,paplet fish recipe,पापलेटचा रस्सा,paplet fry,मालवणी पद्धती मध्ये पापलेट,भरलेलं पापलेट कसं बनवायचं ?
COMMENTS