बेसन लाडू | Besan ladoo
बेसन लाडू | Besan ladoo
साहित्य:-
५०० ग्रॅमसाठी –
४¼ कप किंवा ५०० ग्रॅम रवाळ बेसन,
१/३ कप साजूक तूप,
१ tblsp वेलदोड्याची पूड,
¼ tsp जायफळ पावडर,
६ tblsp दूध,
२ कप बुरा साखर किंवा तगार,
३ tblsp पिस्त्याचे काप
आणि
¼ कप मगज.
साहित्य १ किलोसाठी
-
८½ कप किंवा १ किलो रवाळ बेसन,
१½ कप साजूक तूप,
½ कप डिंक,
२½ tblsp वेलदोड्याची पूड,
१ tsp जायफळ पावडर,
¼ कप दूध,
३½ कप बुरा साखर किंवा तगार,
¼ कप पिस्त्याचे काप आणि
½ कप मगज.
कृती –
प्रथम चण्याची डाळ ५/७ मिनिटे मंद गॅसवर भाजून तीला थंड
करावी आणि चक्कीवर रवाळ दळून घ्यावी. त्यानंतर पॅनमध्ये थोडं साजूक तूप घालून मगज
आणि पिस्ता १ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा.
पुन्हा अर्धे तूप घालून त्यात डिंक फुले पर्यंत परतावा आणि
नंतर त्यात बेसन घालून वरून उरलेले सर्व तूप घालावे आणि मंद आचेवर खमंग सुगंध सुटे
पर्यंत भाजावे.
खमंग सुवास सुटला कि यात दुधाचा हबका मारावा आणि परतून
घ्यावं. त्यानंतर यात वेलची, जायफळाची पूड घालावी आणि एकजीव करून
घ्यावं.
एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा आणि बेसन कोमट थंड करून त्यात
बुरा साखर एकजीव करून घ्यावी.
त्यानंतर यात डिंक, मगज आणि पिस्ता
एकजीव करून लाडू वळवून घ्यावेत.
हे लाडू २०/२५ दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता.
COMMENTS