सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe
सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe
साहित्य –
- ४ ते ५ तास भिजलेले २५०
ग्रॅम काबूली चणे,
- २ कांदे बारीक चिरलेले, २
टोमॅटो बारीक चिरलेले,
- खडा मसाला - २ तेजपत्ते, १
मसाला वेलची,
- ४ लवंग,
- ७ काळीमीरी,
- ½" दालचीनी,
१ चक्रीफूल,
- १ tsp राई,
- १ tsp जीरे,
- २½ tblsp घरगुती लाल मसाला,
- १ tsp घरगुती
गरम मसाला,
- १ tsp आमचूर
पावडर,
- ½ tsp हळद,
- ¼ tsp हिंग,
- ७/८ काडिपत्ते,
- ¼ कप भाजलेले सुके खोबरे,
- मूठभर कोथिंबीर,
- ¼ कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
- ½ कप ओल्या नारळाचा खीस,
- ६/७ लसूण पाकळ्या, १"
आले,
- २ हिरव्या मिरच्या,
- ७ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
भटुरे बनवण्यासाठी साहित्य –
- २½ कप
मैदा,
- ¼ कप दही,
- ¼ tsp खायचा सोडा,
- २ tblsp तेल,
- ½ कप साधे किंवा हलके कोमट पाणी,
- ½ कप बारीक रवा,
- १ tsp साखर,
- १ tsp मीठ आणि तळण्यासाठी सोयीनुसार तेल.
कृती –
- प्रथम एका परातीत मैदा, दही, रवा, साखर, रवा, खायचा सोडा आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे आणि यात पाणी मिक्स करून चपातीला मळतो त्यापेक्षा जास्त घट्ट गोळा मळून घ्यावा.
- गोळा मळून झाल्यावर त्यावर थोडे तेल फिरवून घ्या म्हणजे गोळा कोरडा पडणार नाही. आता मीठ ३ तासासाठी मुरवत ठेवा.
- एका बाजूला कुकरच्या भांड्यात भिजलेले काबुली चणे घ्या त्यात १½ ग्लास पाणी आणि ½ tsp मीठ घालून कुकरला ३ शिट्ट्या घेऊन उकडून घ्या.
- मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर आणि मिरची यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे.
- एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, खडा मसाला घालून हलका परतून घ्या. त्यानंतर त्यात कडीपत्त्याची पाने आणि कांदा घालावा. परतून घ्यावा. कांदा मऊ झाला कि यात टोमॅटो घालावी.
- आता कांदा आणि टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत शिजवून घ्यावीत. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला, हळद घालवून मसाला फोडणीत चांगला परतावा. मसाला परतल्यानंर यात तयार केलेले वाटण घालून २/३ मिनिटे चांगले परतावे.
- त्यानंतर यात उकडलेले काबूली चणे पाण्यासहीत घालावे ( चण्याचे पाणी रस्सा जीतका घट्ट किंवा पात्तळ हवा असेल त्यानुसार घालावा. ) सोबत घरगुती गरम मसाला, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे.
- आता वर झाकण ठेवून ५ मिनिटांची वाफ काढावी, त्यानंतर गॅस बंद करावा. ( फोडणी करताना गॅस मंद करावा, वाटण घातल्यावर गॅस मध्यम करावा आणि शेवटी वाफ काढताना गॅस पुन्हा मंद करावा. ) संपूर्ण भाजी ३० मिनिटांत तय्यार होते.
- ३ तासानंतर भटुर्याचे पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे. हव्या त्या आकारात गोळे तयार करून चपातीपेक्षा जाड लाटून घ्या आणि गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. भटुरा फुलला कि दुसऱ्या बाजूने तळून घ्या. दोन्ही बाजूने हलका सोनेरी तांबूस रंग आणावा.
Tag-chole bhature recipe,punjabi chole bhature recipe,chole bhature,delhi style chole bhature recipe,bhature recipe,authentic choley bhature recipe,bhatura recipe,how to make chole bhature,chole recipe,chole bhature paneer recipe,chole bhature ki recipe,punjabi chole recipe,bhature recipe in hindi,amritsari chole bhature,quick chole bhature recipe,best chole bhature recipe,chole recipe in hindi,bhatura recipe at home,amritsari chole recipe
COMMENTS