अंडा करी (हॉटेल सारखी) | Egg curry (hotel-like)
अंडा करी (हॉटेल सारखी) | Egg curry (hotel-like)
साहित्य :-
- पाच अंडी
- एक इंच आले
- दहा ते बारा लसून पाकळ्या
- दहा ते बारा भिजलेले काजू
- दोन मोठे कांदे
- चार मध्यम टोमॅटो
- तीन ते चार लवंग
- तीन ते चार काळीमिरी
- छोटा दालचिनीचा तुकडा
- एक चक्रीफुल
- एक तेजपत्ता
- एक चमचा गरम मसाला
- एक चमचा हळद
- एक चमचा धने जिरे पावडर
- एक चमचा कसूरी मेथी
- दोन चमचे कश्मीरी लाल तिखट
- चवी नुसार मीठ
- चार चमचे तेल
- अर्धी वाटी कोथिंबीर
- एक ग्लास पाणी
- दोन चमचे बटर
कृती :-
- प्रथम पाच अंडी उकडून व सोलून घ्या.
- तीन ते चार टोमॅटो शिजवून त्याची साल काढून मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी बनवून घ्या.
- एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करा, त्यात उकडलेली अंडी चाकूने छेद करून घ्या व सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
- त्यात चिमूटभर हळद मीठ व गरम मसाला घालून आणखी दोन मिनिटे परतून घ्या. त्यातच चिमुटभर लाल तिखट घाला व पुन्हा परतून घ्या. ही अंडी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या.
- आता कढईमध्ये थोडे तेल घालून त्यात कांदे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले कांदे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्या व यातच आले लसूण कोथिंबीर भिजवलेले काजू घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. पेस्ट बनवताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा.
- एका कढईमध्ये चार चमचे तेल घालून, त्यात गरम झाल्यावर सर्व खडे मसाला घाला व दोन मिनिटांनी तयार पेस्ट, टोमॅटो प्युरी त्यामध्ये घाला आणि चांगले परतून घ्या.
- यातच एक चमचा गरम मसाला, एक चमचा धने-जिरे पावडर एक चमचा हळद घाला. आणखी दोन मिनिटे परतून घ्या.
- आता यात एक ते दीड चमचा कश्मिरी लाल तिखट घाला आणि दोन मिनिटे पुन्हा परतून घ्या.
- आता यात साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी घाला व मिश्रण परतून पुन्हा पाच मिनिटे झाकून मंद गॅसवर शिजवून घ्या.
- पाच मिनिटांनी झाकण उघडून यात भाजून घेतलेली अंडी टाका आणि दोन ते तीन मिनिटे मंद गॅस वर ठेवून झाकण बंद करा.
- दोन मिनिटाने झाकण उघडून कसुरी मेथी बारीक करून, चिरलेली कोथिंबीर टाका व गॅस बंद करा.
अशा तऱ्हेने
हॉटेल सारखी अंडाकरी तयार होईल
Tag- अंडा करी,होटल वाली अंडा करी बिना किसी स्पेशल मसाले के,अंडा करी बनाने की विधि,अंडा करी रेसिपी हिंदी में,अंडा करी कैसे बनाया जाता है,वेज अंडा करी,होटल अंडा करी,शाही अंडा करी,अंडा करी रेसिपी,अंडा वेज करी,अंडा करी कैसे बनाएं,ढाबा स्टाइल अंडा करी,अंडा करी सब्जी रेसिपी,अंडा करी कैसे बनाते है,वेज अंडा करी कैसे बनाएं,कैसे बनाएं वेज अंडा करी,अंडे बिना बनाये अंडा करी,होटल वालों से सीखे अंडा करी,अंडा वेज करी कैसे बनाएं,धमाकेदार ढाबा स्टाइल अंडा करी,egg curry,egg curry recipe,anda curry,egg masala curry,anda curry recipe,how to make egg curry,dhaba style egg curry,simple egg curry recipe,egg curry gravy,restaurant style egg curry,curry,hotel style egg curry,egg masala curry recipe,egg curry for chapathi,egg curry recipe in hindi,best egg curry recipe,egg curry masala,spice eats egg curry,mutta curry,anda curry dhaba style,simple egg curry,egg curry grandmas menu,masala egg curry
COMMENTS