पालक पराठा | Palak Paratha
पालक पराठा | Palak Paratha
साहित्य
- गव्हाचे पीठ - तीन वाट्या
- बेसन पीठ - दोन वाट्या
- ओवा - एक ते दीड चमचा
- तीळ - आवश्यकतेनुसार
- तेल - तीन ते चार चमचे
- मीठ - चवीनुसार
- चिरलेला पालक - दोन वाट्या
- चिरलेली कोथिंबीर - अर्धी वाटी
- आले - अर्धा इंच
- लसूण - नऊ ते दहा पाकळ्या
- हिरवी मिरची - सात ते आठ
- धने जिरे पावडर - दोन चमचे
- चवीनुसार मीठ
कृती
- प्रथम मिक्सरच्या भांड्यात पालक, मिरची, आले, लसूण घालून पेस्ट तयार करून घ्यावी.
- एका ताटात गव्हाचे पीठ व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात ओवा, धने-जिरे पावडर , मीठ, चिरलेली कोथिंबीर व मिक्सर मधील पेस्ट घालून पीठ चांगले मळून घ्या व त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ
- घालून पीठ चांगले मळून घ्या.
- त्यानंतर मळून घेतलेले पीठ पंधरा मिनिट झाकून ठेवा.
- पंधरा मिनिटांनी तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे वळून घ्या. या गोळ्यांना वरून तीळ लावा व गोळे पिठात बुडवून लाटून घ्या.
- चपाती प्रमाणे लाटुन ते तव्यामध्ये खरपूस भाजून घ्या.
हा पराठा पौष्टिक तर आहेच शिवाय लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो. दही किंवा लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकता.
**************************************
Tag-palak paratha recipe,palak paratha calories,palak paratha recipe in hindi,palak paratha in marathi,palak paratha kaise banate hain,palak paratha and sabji,palak paratha benefits,palak paratha banane ka,palak paratha banana bataen,palak paratha combination,palak dal paratha,palak dhaniya paratha,easy palak paratha recipe,palak paratha recipes,palak paratha for weight loss,palak paratha for baby,palak paratha for dinner
COMMENTS