मटन रस्सा | Mutton gravy
मटन रस्सा | Mutton gravy
साहित्य
- मटण - अर्धा किलो
- सुके खोबरे - एक ते दीड वाटी
- कांदा - 1( मध्यम आकाराचा)
- आले - एक इंच
- लसुन - दहा ते बारा पाकळ्या
- कोथिंबीर - अर्धी वाटी
- धने-जिरे पावडर - दोन चमचे
- दालचिनी - दोन ते तीन तुकडे
- खसखस - दोन चमचे
- काळे तीळ - दोन चमचे
- भाजके डाळे - दोन चमचे
- तेल -चार ते पाच चमचे
- काळे तिखट - दोन ते तीन चमचे
कृती
- प्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे व त्यामध्ये मीठ आणि हळद लावून 15 मिनिटे झाकून ठेवावे.
- ते मटण मंद गॅसवर कुकरला लावून आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यावेत.
- एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे व ते बाजूला ठेवावे.
- कढईमध्ये कमी तेलात सुके खोबरे व कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आले, लसूण, दालचिनी घालून हे सर्व मिश्रण कमीत कमी पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यावे.
- तसेच कढईमध्ये तीळ व खसखस भाजून घ्यावी व मिक्सर च्या साह्याने बारीक करून एका भांड्यात बाजूला घ्यावे.
- तसेच भाजके डाळे मिक्सर च्या साह्याने बारीक करून घ्यावे.
- एका पातेले मध्ये चार ते पाच चमचे तेल घ्या व त्यामध्ये ओले वाटण घालून ते दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्या. त्यामध्येच खसखस व तिळाचा कूट घाला. तसेच त्यामध्ये धने-जिरेपूड सुद्धा घाला. दोन ते तीन मिनिट परतून घ्या.
- पातेलेमध्ये परतून घेतलेल्या मसाल्यात काळे तिखट घालून मिश्रण मिक्स करून घ्या व त्यामध्ये मटण घालून चांगले हलवून घ्या. तसेच त्यामध्ये भाजलेल्या डाळ्याची पावडर घाला.
- वरील मिश्रण सर्व परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम केलेले पाणी गरजेनुसार घ्या व चवीनुसार मीठ घाला. साधारण पाच मिनिट मंद गॅस वरती ठेवा.
अशा तर्हेने तुमचा
झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे.
*****************************************
Tag-mutton gravy recipe in marathi,mutton gravy recipe in hindi,mutton gravy recipe for rice,mutton gravy recipe yummy tummy,recipe for mutton gravy,mutton curry recipe bihari style,mutton recipes gravy,mutton curry gravy recipe,mutton curry gravy,best mutton gravy recipe,mutton curry recipe cooker,mutton curry cut recipe,easy mutton gravy recipe,easy mutton gravy,mutton gravy home cooking
COMMENTS