काकडीची कोशिंबीर | Cucumber salad
काकडीची कोशिंबीर | Cucumber salad
काकडीची कोशिंबीर कशी करायची याविषयी लागणारे साहित्य व त्याची कृती खालीलप्रमाणे...
- हिरव्या काकड्या - 3
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - 3 चमचे
- किसलेले ओले खोबरे - 3चमचे
- बारीक चिरलेली कोथिंबीर - मुठभर
- साजूक तूप - 1 चमचा
- जिरे - अर्धा चमचा
- साखर - अर्धा चमचा किंवा चवीनुसार
- हिंग - पाव चमचा
- शेंगदाण्याचा कूट - 2 चमचा
- लिंबाचा रस - अर्धा लिंबू
- मीठ - चवीनुसार
कृती:-
- प्रथम स्वच्छ काकडी धुऊन घ्यावी व त्याची साल काढावी तसेच दोन्ही बाजूंची टोके कापून घ्यावीत. ( काकडी कडू तर नाही ना याची पहिल्यांदा खात्री करून घ्यावी)
- त्यानंतर काकडी ला थोडेसे मीठ लावून दोन ते तीन मिनिटे ठेवावी व नंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
- किसलेली काकडी, ओले खोबरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर मिरची, साखर, लिंबाचा रस, व गरजेनुसार मीठ घालून एकत्रित करावे.
- साजूक तूप थोडेसे गरम करून त्यामध्ये जिरे व हिंग घालून फोडणी तयार करावी व तयार केलेल्या एकत्रित मिश्रणावर घालावे.
अशा तऱ्हेने तुमची रुचकर काकडी कोशिंबीर तयार झाली.
***************************************************
Tag-cucumber salad recipe,cucumber salad recipe indian,cucumber salad for weight loss,cucumber salad calories,cucumber salad indian,cucumber salad benefits,cucumber salad asian recipe,cucumber salad asian spicy,cucumber salad all recipes,a cucumber salad recipe,a good cucumber salad,a quick cucumber salad,a cool cucumber salad
COMMENTS