नारळाची बर्फी | Coconut Burphi
नारळाची बर्फी | Coconut Barphi
साहित्य
- ओल्या नारळाचा खीस - चार वाट्या
- साखर - अडीच वाटी
- तूप - दोन चमचे
- वेलची पूड - एक चमचा
- काजू बदामाचे काप - आवडीनुसार
- दूध - एक कप
कृती
- प्रथम ओल्या खोबऱ्याचा खीस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
- एका कढईत तूप टाकून गरम होऊ द्यावे, नंतर त्यात ओल्या नारळाचा खीस टाकून परतून घ्यावा.
- त्यात साखर घालावी, नंतर त्यात दूध घालावे. हे दूध मलईयुक्त असल्यास बर्फी आणखीनच छान होते.
- आता हे मिश्रण पातळ होईल. मंद गॅसवर सतत हालवत रहावे.
- मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलचीपूड घालावी.
- कढईतील मिश्रणाचा गोळा तयार होत आहे असे लक्षात आल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतावे.
- गरम मिश्रण तूप लावलेल्या वाटीने ताटात एकसमान करून घ्यावे.
- गरम असतानाच त्यावर काजू-बदामाचे बारीक चिरलेले काप पसरवावे.
- पंधरा-वीस मिनिटांनी चाकूच्या साह्याने बर्फी हव्या त्या आकारात कापून घ्यावी.
अशा तऱ्हेने तुमची नारळाची गोड बर्फी तयार झालेली आहे.
ही बर्फी उपवासासाठी ही खाऊ शकता.
Tag-coconut burfi,coconut burfi price,coconut burfi in marathi,coconut burfi recipe
coconut burfi benefits,coconut burfi calories,coconut burfi cake,coconut burfi description,coconut barfi definition,how to do coconut burfi,coconut burfi easy recipecoconut burfi easy method,coconut burfi from dry coconut
COMMENTS